संस्थेबद्दल :

पुणे ही विद्येची माहेरनगरी. पुण्यामध्ये नोकरी व उद्योगाच्या निमित्ताने विविध जाती धर्माचे लोक येऊन सुखाने राहत आहेत. यामध्येच आपल्या जंगम समाजतील लोकही खूप आहेत. तेही राज्याच्या व देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून इथे आले आहेत. त्यांना संघटित करणे, त्यांच्या समस्या जाणून योग्य ती मदत करणे व समाजाची उन्नती करणे या हेतूने सन २०१४ साली श्री. ष. ब्र. १०८ निलकंठ शिवाचार्य महाराज (धारेश्वर) श्री. ष. ब्र. १०८ महादेव शिवाचार्य महाराज (वाईकर) यांच्या शिवाशीर्वादाने, वीरमाहेश्वर जंगम संस्था, पुणे (VMJS) ची स्थापना करण्यात आली. जंगम समाजातील तसेच इतर समाजच्या लोकांनी दिलेल्या सहकार्य व योगदानामुळे संस्थेने अल्पावधीतच आपल्या कार्याचा मेरू चौफेर उधळला.

संस्थेचे वधु-वर मेळावा व जंगम परिवार डायरी हे उपक्रम सर्व लोकांनी नावाजले. संस्थेकडून दरवर्षी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना अखिल भारतीय पातळीवर वीरमाहेश्वर भूषण पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या पुढील कार्यास प्रोत्साहन दिले जाते.

तसेच VMJS च्या व्हाट्सऍप ग्रुप च्या माध्यमातून समाजातील युवा पिढीला नोकरी व उद्योगासाठी लागणारी सर्व माहिती व मदत पुरवली जाते. समाजातील लोकांमधील अंगीभूत गुणांना वाव देण्यासाठी वीरमाहेश्वर कल्चरल क्लबची स्थापना सन २०१७ साली करण्यात आली, ज्याच्या माध्यमातून लोकांना मनोरंजनाचा आस्वाद दिला जातो. या संस्थेरूपी छोट्याश्या रोपट्याला वटवृक्ष बनवून त्याच्या सावलीचा आनंद आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी आमच्या सोबत या हीच विनंती. धन्यवाद.




संस्थेचे उद्दिष्ट

सर्व स्तरावरील जंगम बंधू भगिनींना एकत्र आणणे व समाजाच्या विकासाला हातभार लावणे हा उद्देश.

vmjs
प्रौत्साहन

पौरौहित्य करण्यास मुला मुलींना प्रौत्साहन देणे.

स्वयंरोजगार

स्वयंरोजगार करण्यास मार्गदर्शन करणे.

शिक्षण

शिक्षण व उच्चशिक्षणासाठी प्रेरणा देणे.

वधू-वर मेळावा

जंगम समाज वधू-वर मेळावा आयोजित करणे.

आरोग्य शिबीर

आपल्या समाजातील लोकांसाथी आरोग्य शिबीर आयोजीत करणे.

सांस्कृतीक कार्यक्रम

कलाकरांसाठी व्यासपीठ, सांस्कृतीक कार्यक्रम आयोजन करणे.

पुरस्कार

विविध क्षेत्रातील मान्यवरांना वीरमाहेश्वर पुरस्कार देवून सन्मानीत करणे.

डायरी प्रकाशन

आपल्या समाजातील लोकांची व त्यांच्या व्यवसायाची माहिती प्रकाशित करणे.

पंचाचार्य

vmjspune
श्रीमद्‌जगद्‌गुरू रेवणाराध्य शिवाचार्य (रंभापुरी)
शिवाचार्य रंभापुरी महाराजस्वामी सोमेश्र्वर शिवाचार्य
पत्ता : वीर सिंहासन मठ, मु.पो. बाळेहोन्नुऱ, जि. चिकक्ष्मंगळुर, कर्क्ष्नाटक राज्य़ , पिन - ५७७११२.
फोन - ०९४४८४५१८२४
vmjspune
श्रीमद्‌जगद्‌गुरू मरूळाराध्य शिवाचार्य(उज्जयनी)
श्री. श्री. श्री . १००८ जगद्‌गुरू सद्वर्मासिंहासनाधिदश्र्वर मरूळाराध्य शिवाचार्य
पत्ता : उज्जयनी महास्वामीजी उज्जयनी मठ, मु.पो. उज्जयनी शिवाचार्य सिंद्धलींग राजदेशी केंद्र, ता.कुडलगी , जि. बेल्लरी कर्नाटक राज्य, पिन - ५७२१७१ .
फोन - ९९८६५८१८०६
vmjspune
श्रीमद्‌जगद्‌गुरू एकोरामाराध्य शिवाचार्य(हिमवत्केदार)
श्री. श्री. श्री. १००८ जगद्‌गुरू वैराग्य सिंहासनाधिदश्र्वर रावळ सिद्धेश्र्वरलिंग भिमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी
पत्ता : मु.पो. उरवीमठ, जि. चमेली , उत्तरप्रदेश राज्य, पिन- २४६४६९ .
फोन - ०९०११८८५९५१
vmjspune
श्रीमद्‌जगद्‌गुरू पंडिताराध्य शिवाचार्य(श्रीशैल पर्वत)
श्री. श्री. श्री. १००८ जगद्‌गुरू सुर्या सिंहासनाधिदश्र्वर उमापती पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी डॉ. चत्रसिद्धाराम पंडिताराध्य
पत्ता : मु.पो. श्री शैल्य , ता. आत्मकुर, जि. करनुल, आंध्रप्रादेश, पिन- ५१८१०२ .
फोन - ०८५२४२८७१२३
vmjspune
श्रीमद्‌जगद्‌गुरू विश्र्वाराध्य शिवाचार्य(श्रीमहाक्षेत्र काशी)
श्री. श्री. श्री. १००८ जगद्‌गुरू ज्ञानसिंहासनाधिदश्र्वर डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी
पत्ता : मु.पो. काशी जंगमवाडी मठ महासंस्थान, श्री क्षेत्र काशी वाराणसी, बनारस, , उत्तरप्रदेश पिन- २२१००१.
फोन - (०५४२) ३२११४६ , ९४४८१२८५६४

आमचे प्रेरणा स्थान

vmjspune
नाव : श्री. ष. ब्र. १०८ निलकंठ शिवाचार्य महाराज (धारेश्वर)
vmjspune
नाव : श्री. ष. ब्र. १०८ महादेव शिवाचार्य महाराज (वाईकर)

गॅलरी

कार्यकारिणी

अभिप्राय

वृत्त विभाग



ई-मेल

संस्थेकडून कोणत्याही प्रकारची माहिती   घ्यावयाची अथवा द्यावयाची असेल तर खालील ठिकाणी  ई-मेल वर संपर्क करू शकता.

आम्हाला संपर्क करा. शक्य तितक्या लवकर आम्ही फोन आणि ईमेलद्वारे आपल्याशी संपर्क साधू